Showing posts with label kavita. Show all posts
Showing posts with label kavita. Show all posts

Thursday, August 4, 2011

भारतभूचे रक्षक

आम्हीच आहो भारतभूचे छोटे लाडके बालक
शिकून सवरून आम्हीच बनू उद्या राष्ट्राचे चालक
आई बाबा प्रणाम तुम्हा तुम्ही आमचे पालक
सर बाई ज्ञानदाते तुम्हीच आमचे शिक्षक
भ्रष्टाचार गरिबी महागाई भारतभूचे भक्षक
आई बाबा सर बाई कोण होणार देशाचे रक्षक ?
दादा ताई मिळेल ना भारत भूला मोक्ष ?
मोठे होउ आम्ही तेंव्हा असतील ना हे वृक्ष ?
पेट्रोल ग्यास संपणार नाही राहाल ना तुम्ही दक्ष ?
लाईट पाणी असेल कहो तेही होईल फस्त?
मिळेल ना आम्हा शुद्ध हवा राहू ना तंदुरुस्त?
आई बाबा बोला ना का झालात तुम्ही गप्प?
बोला ना सर बाई का सारेच झाले ठप्प ?
अरे ताई नको ना रडू दादा तुही
चुकले आम्हाला माफ करा
पुन्हा असे प्रश्न विचारणार नाही