Monday, February 23, 2009

गाता गाता जाइन मी

गाता गाता जाइन मी, जाता जाता गाइन मी

गेल्यानंतर या गीतांतून, या शब्दातून राहीन मी


तुझ्याच नकळत तुझ्या ओठांवर येइल माझे गीत तेंव्हा

वारा होउन वाहीन मी आणि धारा होउन बरसेन मी

बरसल्यानंतर तुझ्या केसांवर, तुझ्या ओठांवर जलबिंदु होउन राहीन मी

गाता गाता जाइन मी, जाता जाता गाइन मी


उरकून सारी कामे दुपारी थोड़ा वेळ निजशिल तेव्हा

झूलुक वार्याची होउन येइन मी आणि दचकून तू उठ्शील तेंव्हा

तुझ्या हृदयात धडधडत राहीन मी आणि श्वासात पोकळी करून जाइन मी


हे सारे विपरीत घडताना सारेच सतावातिल तेव्हा

माझेच चुटकुले सांगुन हसशील सार्यान्सोबत जेव्हा

तुझ्या गालावर खळी होउन येइन मी

गाता गाता जाइन मी, जाता जाता गाइन मी

असाच सजनी गेल्यानंतर तुझ्या सर्वांगात भरून राहीन मी